साडवली येथून चोरट्यांनी मोटरसायकल चोरली
संगमेश्वर :साडवली येथील समीर मुकुंद मोहिले, रा. कासारवाडी, संगमेश्वर यांची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची फिर्याद पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. यातील मोहिले यांनी श्री समर्थकृपा ऍटोमोबाईल्स या दुकानासमोर लावलेली हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायलक क्र. एम.एच. ०८/एसी/४९६१ ही अज्ञात चोरट्याने पळविली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मोहिले यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com