
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर, शेतीचे नुकसान, भुईबावडा घाटात दरड कोसळल्या.
विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाला सुरवात झाली. खेड, सावर्डेसह रत्नागिरी तालुक्यात जोरदार पाऊस पडला. किनारपट्टी परिसरात वेगवान वारेही वाहत होते. या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले. या पावसाचा फटका भातशेतीला बसला असून अनेक ठिकाणी उभी रोपे आडवी झाली आहेत. कापणीयोग्य भात रोपांसाठी हा पाऊस त्रासदायक ठरु शकतो सिंधुदुर्गात आज पुन्हा पावसाने झोड उठविली. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सायंकाळी भुईबावडा घाटात तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे शेकडो वाहने घाटरस्त्यात अडकून पडली आहेत.जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला विजांच्या लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटांसह मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मुसळधारेने हळव्या भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भुईबावडा घाटात सायंकाळी तीन ते चार ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे शेकडो वाहने घाट रस्त्यात अडकून पडली होती. घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. घाट रस्त्याला पर्यायी मार्ग नसल्याने तसेच हा एकमेव घाट सुरू असल्यानेवाहनचालकांचे मोठे हाल झाले. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे