
आरडीसी बँकेतील एम्प्लॉईज युनियन व बँक करारामुळे कर्मचार्यांना पगारवाढ
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा आरडीसी बँकेतील कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत नुकताच बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे व बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष माजी खासदार आनंदराव अडसुळ यांच्यात नुकताच करार झाला. या करारामुळे बँकेतील सुमारे साडेचारशेहून अधिक कर्मचार्यांचे पगार १ हजार रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत वाढणार आहे. दर वर्षानी युनियनमार्फत नवा करार केला जातो. आरडीसी बँकेकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला जातो. या करारामध्ये कर्मचार्यांना घरासाठी ३० लाख रु. कर्ज मिळत होते त्याची वाढ आता ४० लाख करण्यात आली आहे. एखाद्या कर्मचार्याचा नोकरीत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या कराराच्यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक संजय रेडीज, ऍड. दीपक पटवर्धन, शेखर निकम, एम.डी. गांगण, तर संघटनेचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी व कर्मचारी प्रतिनिधी जितेंद्र साळवी, बँक युनियन सेक्रेटरी आबा सावंत, कुणाल दाभोळकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com