जयवंत दुधवडकर राजापूर काँग्रेसचे प्रभार तालुकाध्यक्ष
राजापूर तालुका काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षपदी जयवंत दुधवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राजापूर तालुकाध्यक्ष भास्कर सुतार यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता यामुळे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पद रिक्त होते या ठिकाणी प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून जयवंत दुधवडकर यांची नेमणूक केल्याचे पत्र जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर यांनी दिले आहे.
www.konkantoday.com