एलईडी मासेमारी बंदीचा अध्यादेश काढण्याचा राज्याला अधिकार नाही-खासदार सुनील तटकरे
एलईडी मासेमारी बंदीचा निर्णय हा केंद्राच्या अखत्यारीतील असून राज्यामधून कोणी याबाबत अध्यादेश काढू शकत नसल्याचे मत रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दापोली येथे बोलताना व्यक्त केले .राज्याचे पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम यांनी एलईडी मासेमारी संदर्भात लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.कदम यांचे नाव न घेता तटकरे म्हणाले निवडणुका जवळ आल्या की राज्यातील मंत्र्यांना एलईडी मच्छीमारी बंदी करण्याबाबत स्वप्न पडू लागतात मात्र हा विषय राज्याच्या अखत्यारीत नाही हे त्यांनी समजून घेतलेले नाही.आपण हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात मांडला असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com