रत्नागिरी स्थानकात रेल्वेमधून १लाखाची बनावट दारू पकडली
कोचीवली डेहराडून या रेल्वेच्या जनरल बोगीतील स्वच्छतागृहात लपवून ठेवलेली १लाख रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या पाचशे छप्पन बॉटल रेल्वे पोलिसांनी जप्त केले आहेत. सदरच्या गाडीत गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची खबर रेल्वे पोलिसांना मिळाली होती पोलीस निरीक्षक अजित मधाळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने रत्नागिरी स्थानकात ही गाडी येताच या जनरलच्या डब्याला घेराव घातला येथील स्वच्छतागृहाची तपासणी केली असता स्वच्छता गृहाच्या वरील बाजूस एक कप्पा करून त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवलेल्या आढळल्या या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. याआधीही काही गाड्यातून स्वच्छतागृहात अशाप्रकारे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या पकडण्यात आल्या होत्या.या वाहतुकीमध्ये काही रेल्वेचे कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. मागील वेळेप्रमाणे यावेळीही पोलिसांना या प्रकरणातील आरोपी मिळू शकलेले नाहीत.
www.konkantoday.com