जिल्हा उद्योग केंद्रातर्फे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण
खेड :महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र रत्नागिरी जिल्हाच्यावतीने जिल्हा उद्योग केंद्र रत्नागिरी तर्फे सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी चिपळुण येथे सर्वसाधारण योजना व विशेष घटक योजना अंतर्गत रिटेल मॅनेजमेंट व रेडिमेड गारमेंट मेकींग या दोन कोर्ससचे एक महिना कालावधीचे प्रशिक्षण मोफत होणार आहे.या मध्ये रिटेल मॅनेजमेंटचा परिचय,वितरणाची साखळी रिटेल मॅनेजमेंट आणि विपणन मिश्र,रिटेलींग मधील कल,विक्रय व्यवस्थापन,रिटेल मधील तंत्रज्ञानाचा वापर,ग्राहकांच्या आवडी-निवडी, संघटनात्मक रचना आणि मानवसंधारन व्यवस्थापन यांचा समावेश आहे व रेडिमेड गारमेंट मेकींन या कोर्स मध्ये बेवी फ्रॉक,स्कर्ट,सलवारकुर्ता,ब्लाऊज चे विविध प्रकार,पंजाबी चुडीदार,विविध पॅटर्नचे सुट इ रेडिमेड गारमेंट तयार करणे यांचा समावेश आहे.
प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्याला प्रशिक्षणार्थीला प्रमाणपत्रसह 1000 हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट आहे.रत्नागिरी जिल्हातील वय 18 ते 50 असणाऱ्यांनी या मोफत कोर्सेचा लाभ घ्यावा . असे आवाहन कार्यक्रम आयोजक रेश्मा तांबे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी 9730238342/9653391877 या नंबरवर संपर्क करावा.
www.konkantoday.com