
पागमळा येथील तरूणाने गळफास घेवून केली आत्महत्या
चिपळूण ः शहरातील पाग गोपाळकृष्णवाडी येथील केबल व्यावसायिक तरूणाने पागमळा येथील मारूती मंदिरानजिक एका संरक्षण भिंतीच्या ठिकाणी केबलने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मंगेश मधुकर कांबळी (३०) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. पागमळा येथील नदिकिनारी असलेल्या मारूती मंदिरनजिक ही घटना घडली. याबाबत संतोष मनोहर कांबळी यांनी पोलिसांना खबर दिली आहे.