पैसाफंडच्या माजी विद्यार्थीनी स्नेहल करडे यांचा भावपूर्ण सत्कार
संगमेश्वर:ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षांमध्ये सहभाग घेतात. मात्र यातील उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अल्प असल्याने ते वाढविण्यासाठी प्रयत्न होणे जरूरीचे आहे. यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन पैसा फंड विद्यालयाची माजी विद्यार्थीनी स्नेहल करडे यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होवून सध्या त्या संभाजीनगर येथे नगररचना विभागात द्वितीय श्रेणी अधिकारी म्हणून काम करीत आहेत. त्यांचा सत्कार पैसा फंड संस्था आणि प्रशालेच्यावतीने व्यापारी संघाचे अध्यक्ष शंकर भिंगार्डे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी करण्यात आला.