
ओमसाई मित्रमंडळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी लागले
रत्नागिरी :साळवी स्टॉप येथील ओमसाई मित्रमंडळाचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने भरगच्च कार्यक्रमाची तयारी करण्यात आली होती. मात्र रत्नागिरीसह कोल्हापूर सांगली येथे निर्माण झालेल्या पुरग्र्रस्त परिस्थितीमुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. अशा लोकांना सामाजिक भावनेतून खारीचा वाटा म्हणून मदत करण्याचे ओमसाई मंडळाने ठरविले आहे. यानिमित्ताने आता संगीत रजनी नाटक व ऑर्केस्ट्रा या तीन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून त्यासाठी तिकिटे ठेवण्यात येणार असून या तिकिट विक्रीतून मिळालेली रक्कम पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे.असे संस्थेचे अध्यक्ष प्रविण मलुष्टे, कार्यवाह अनंत आगाशे, गौरांग आगाशे, संजीव शेडगे यांनी दिली आहे. मिरवणुका व रोषणाईवरचा खर्च यावेळी टाळण्यात येवून कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com