चौपदरीकरणाच्या कामाच्या तक्रारीबाबत जिल्ह्यात १७ तारखेला ठाण मांडण्याचा खासदार सुनिल तटकरे यांचा निर्धार
रत्नागिरी:कोकणातील चौपदरीकरणाच्या कामाबाबत अनेक तक्रारी आहेत. या प्रश्नावरून आंदोलने होवून काही लोकप्रतिनिधींना अटकही झाली आहे. आता कोकणात लवकरच गणेशोत्सव येत आहे. यासाठी आपण १७ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहोत. आम्ही या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाबाबत पाहणी करणार आहोत. खेड येथील जगबुडी नदीवरील नवा पुल चालू करण्याबाबत ठाम राहणार आहेत. सध्या कशेडी घाटातील रस्त्याचा काही भाग खचला आहे. यामुळे या सर्व परिस्थितीला कोण जबाबदार आहे याची आपण माहिती त्या दिवशी घेणार आहोत. यामध्ये जर अधिकारी जबाबदार असेल तर अधिकार्यांवर किंवा कोणीही मोठा ठेकेदार जबाबदार असेल तर त्याविरूद्ध कारवाई करावी यावर आम्ही ठाम राहणार आहोत. हा प्रश्न सुटेपर्यंत आम्ही तेथे ठाण मांडून राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवासाठी या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी वाहने घेवून येणार असल्याने त्याआधी आम्ही याबाबत ठाम भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com