मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक पेटला, मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर बोर घाटातील बोगद्यात ट्रकने पेट घेतला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. मुंबईच्या दिशेने केबल वाहून नेणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली, बोगद्यात ही घटना घडल्याने मोठा दुर्धर प्रसंग ओढवला होता. आग लागल्याची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, आय आर बी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल इत्यादी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. देवदूत टीमच्या साहाय्याने ती आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नव्हती, तेंव्हा खोपोली नगर पालिका फायर ब्रिगेड यंत्रणेला पाचारण करण्यात आले. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

ट्रकच्या टायर आणि इतर साहित्याला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाल्याने अंधारात काहीच दिसत नव्हते. बोगद्यातील इतर वाहनातील प्रवाशांना श्वसनाचा त्रास जाणू लगला होता. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळे पर्यंत महामार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती./सर्वच यंत्रणांनी आग विझविण्या सोबत इतर वाहनातील प्रवाश्याना सुरक्षितपणे धुरापासून श्वसनास त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही. अपघातग्रस्त ट्रक क्रमांक MH 43 BX 7967 घटनास्थळावरून क्रेनचे सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे.खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना असल्याने पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची कारणमीमांसा तपासली जात आहे.

सदर घटना पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली. खोपोली एक्झिट नवीन बोगद्यात ट्रक नं.MH-43-BX-6967 यास शाॉट सर्किटमुळे आग लागली.* ट्रक चालक राहूल जयप्रकाश यादव वय २७ वर्षं रा.रोडपाली कळंबोली मूळ रा उत्तरप्रदेश दुर्घटनेत बचावला.* सदर ट्रक विशाखापट्टणम ते तळोजा या दिशेनं लोखंडी केबल रिंग भरून एक्सप्रेस वे वरून जात होता.* सदर ट्रक लोखंडी केबल रिंग वजनी मालाने भरलेला असल्यामुळे आणि केबिन तसेच टायर निकामी झाल्यामुळे बोगद्यातून बाहेर काढणेचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button