
खेडमधील लोटे एमआयडीसीमध्ये दोन कामगार होरपळले, दुर्घटना लपविण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाचे प्रयत्न?
खेडमधील लोटे एमआयडीसीमधील एका मोठ्या कंपनीमध्ये एका दुर्घटनेत दोन कामगार गंभीररित्या भाजल्याचे उघड झाले आहे. संबंधित कंपनीनेही दर्घटना लपविण्याचा प्रयत्न केला, मात्र याला वाचा फुटली असून एमआयडीसी प्रशासन, तसेच पोलीस प्रशासनाकडून या दुर्घटनेच्या चौकशीला सुरूवात झाली आहे.दुर्घटनामुळे नेहमीच चर्चेत असलेल्या आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या रासायनिक कंपन्या असलेले खेडमधील लोटे एमआयडीसीमधील एका मोठ्या कंपनीमध्ये काही प्रमाणामध्ये गॅस गळती झाल्याची घटना मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी घडली. यामध्ये दोन कामगार गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमी कामगार हे परराज्यातील रहिवासी असून त्यांच्यावर चिपळूण येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना घडल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने याबाबत गुप्तता पाळली, मात्र जखमी कामगारांमुळे हे प्रकरण समोर आले आहे.www.konkantoday.com