रत्नागिरीतील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटींची पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
79

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे विविध तालुक्यात निर्माण झालेल्या पुरग्रस्त परिस्थितीतील बाधितांच्या वैयक्तिक मदतीसाठी तात्काळ १०० कोटी मंजूर करावेत अशा मागणीचे पत्र रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी आदी भागात पुरसदृष्य परिस्थिती तसेच बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी, घरे, विहिरी, साकव, शेती यांचे वित्तीय नुकसान होवून जिवितहानी देखील झाली आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल सादर केल्याप्रमाणे ही हानी भरून काढण्यासाठी एकूण १००४९.३३ लक्ष इतक्या रक्कमेची गरज असल्याचे सांगितले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here