मैथिली खून प्रकरणात पोलिसांची चौकशी सुरू ,अद्याप आरोपी हाती नाही
खेडशी चिंचवाडी येथील मैथिली गवाणकर या महाविद्यालयीन मुलींच्या खुनाप्रकरणी पोलिस सर्व पातळीवर तपास करीत आहेत मैथिली हिचा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला असा वा याचा शोध ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम हे आपल्या सहकाऱ्यांसह करीत आहेत या प्रकरणात काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते परंतु त्यातून फारसे निष्पन्न झाले नाही मैथिली हिचा खून सायंकाळी झाला होता त्यानंतर ग्रामस्थांनी शोध घेतल्यावररात्री उशिरा तिचा मृतदेह सापडला होता या कालावधीत खून झालेल्या जागेकडे गावाबाहेरील कोणी व्यक्ती गेली होती का याचा शोध पोलिस घेत आहेत