
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढविणार-जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोणत्याही निवडणुका यापुढे भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अँड दीपक पटवर्धन यांनी देवरूख येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
देवरुख येथे संगमेश्वर तालुक भाजपच्यावतीने नूतन जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले जिल्ह्यात दोन नंबरवर असलेल्या भाजपला आता एक नंबर वर आणने हे माझे कर्तव्य आहे यासाठी भाजपला कार्यकर्त्यांनी घराघरात पोहचवले पाहिजे.यापुढे ग्रामपंचायतीच्या निवडणुका असोत अथवा नगरपंचायतीच्या असोत अगदी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत असे त्यानी सांगितले.
रत्नागिरी शहरात लवकरच नगराध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाने स्वतःचा उमेदवार उभा करावा अशी मागणी शहर भाजप कार्यकारिणीने जिल्हाध्यक्षांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष यांनी सत्काराच्या वेळी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.
www.konkantoday.com