रत्नागिरी शहर होणार लवकरच विद्युत खांब मुक्त
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात विविध भागात असणारे विद्युत खांब त्यावरून ओढलेल्या छोट्या मोठ्या केबल हे दृश्य लवकरच गायब होणार असून रत्नागिरी शहरात आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत भूमीगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत.
कोस्टल झोनमध्ये तीन शहरात ही योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार असून रत्नागिरीच्या या योजनेला मुख्य कार्यालयातून मंजुरी मिळाली असून आता त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध करण्यात आला आहे. संपूर्ण रत्नागिरी शहरात विद्युत खांब काढून त्याऐवजी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे अविरहित व अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. रत्नागिरी शहर परिसरात सध्या पर्यटन व उद्योगात वाढ होत आहे. त्यामुळे ही योजना झाल्यास त्याला त्याचा फायदा होणार आहे.
महावितरणच्या पॉवर फायनल कॉर्पोरेशनने ९४ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करून त्याला निधी उपलब्ध करून दिला असून आता महावितरणने यासाठी निविदा मागवल्या आहेत. निविदांमधून ठेकेदार निश्चित झाला की या कामाला सुरूवात होणार असून त्यामुळे रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे.
www.konkantoday.com