इंटरनेटवरील रेल्वे बुकींग पडणार प्रवाशांना महाग
रत्नागिरी : दिवसेंदिवस ऑनलाईनचे व्यवहार वाढत आहेत. मालाच्या खरेदीपासून ते रेल्वे तिकिट आरक्षणापर्यंत ऑनलाईनला प्राधान्य देण्यात येत आहे. सरकारनेही ऑनलाईनचा जास्तीत जास्त वापर करण्याचे धोरण ठरवले आहे. मात्र आता ऑनलाईनवरून रेल्वे बुकींग करणार्यांना आर्थिक फटका बसणार आहे. नोटाबंदीच्या काळात ऑनलाईनवरील बुकींग करताना सेवाशुल्क आकारण्यात येत नव्हते. आता हे सेवाशुल्क परत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने स्लीपर क्लाससाठी इंटरनेटवरून बुकींग करणार्यांना २० रुपये तर एसीसाठी आरक्षण करणार्यांना ४० रुपये करण्याचा निर्णय आयआरटीसीने घेतला आहे