- अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे वकील दांपत्याचा निर्घृणपणे झालेल्या खुनाचा रत्नागिरी बार असोसिएशनकडून निषेध व्यक्त करण्यात आला. सोमवारी स. ११ वा. बार असोसिएशनने बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दोषींवर कठोर कारवाई व्हावी व वकिलांसाठी संरक्षण अधिनियम संबंधी निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्याचे निश्चित करण्यात आले. राहुरी येथील न्यायालयात ऍड. राजाराम आढाव व पत्नी ऍड. मनिषा आढाव यांचा खून करण्यात आला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. याप्रकरणी गंभीर दखल रत्नागिरी बार असोसिएशन यांच्याकडून देखील घेण्यात आली. www.konkantoday.com
Back to top button