रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित -आमदार उदय सामंत
रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई सोमेश्वर गावडे आंबेरे व अन्य पूरग्रस्त गावांना आपण आज प्रत्यक्ष भेट दिली.त्या ठिकाणी नुकसान झालेल्या भागांना सर्कलनी अद्यापही भेट दिलेली नाही. यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त शासकीय मदतीशिवाय वंचित आहेत.त्यांना आत्तापर्यंत एक रुपयाचेही मदत मिळालेली नाही. असा आरोप म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केला एवढेच नव्हे तर या पूरग्रस्तांना जी पहिली प्राथमिक मदत म्हणजे गहू ,तांदूळ ही सुधा मदत मिळालेली नाही.याला प्रशासन जबाबदार आहे.आज आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अधिकारी जागे झाले असून आता ते आज सायंकाळी सोमेश्वर येथे सरकारी मदत वाटपाला सुरुवात करणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील ७६२कुटुंब बाधित असून त्यापैकी ३०२कुटुंब जास्त बाधित आहेत. त्यांना तातडीने मदत करणे गरजेचे होते परंतु अनेक ठिकाणी सर्कल फिरकले नसल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असल्याचे त्यानी सांगितले.आज आपण चांदेराई भागाला भेट दिली असता तेथे रेशन दुकानात असलेले धान्य पाण्यात भिजले व त्याला अनेक दिवस होऊन ते कुसलेले आहे.तरी देखील त्याची विल्हेवाट लावण्यासही अधिकारी परवानगी देत नव्हते यामुळे येथे रोगराई पसरण्याचा धोका होता.आपण या अधिकाऱ्यांना येथे रोगराई झाल्यास आपण जबाबदार असू असे लिहून द्या सांगितल्यावरच त्या धान्याची विल्हेवाट लावण्यास परवानगी अधिकाऱ्यांकडून मिळाली.एकूणच प्रशासनाने पूरग्रस्ताकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत मिळाली नसतानाच प्रशासन मात्र विविध संस्थांना एकत्र आणून कोल्हापूर,सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्याकरिता मीटिंग घेत आहेत. त्यांना मदत करण्याआधी तालुक्यातील, जिल्ह्यातील लोकांना मदत मिळाली की नाही हे पाहणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील लोक दान शूर आहेत ते कोल्हापूर व अन्य भागातील लोकांना आपणहून मदत करत आहेत त्यासाठी कोणाच्याही मार्गदर्शनाची गरज नसल्याचेही सामंत यांनी सांगितले आपण आता परत १४ तारखेला तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असून त्या ठिकाणी बाधित कुटुंबांना शासकीय मदत मिळाली की नाही याची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com