
आठवडा बाजार गर्दीने फुलला परंतु महागाईचा फटका ग्राहकांना,कोथिंबीर व पुदीना जुडी ५० तर भाज्या १६० रुपये किलो
रत्नागिरी ः गेले अनेक दिवस अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची कमतरता निर्माण झाली होती. रत्नागिरी शहरात भरलेल्या आठवडा बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र भाजीपाल्याचे दर ऐकून त्यांचा खरेदीचा उत्साह कमी झाला.
आठवडा बाजारात जवळजवळ सर्व भाज्या ४० रुपये पाव म्हणजे १६० रुपये किलो दराने उपलब्ध होत्या. कोथिंबीरच्या जुडीचा ५० रुपये तर पुदीन्याच्या जुडीचा ५० रुपये, टॉमॅटोचे दर ८० रु. किलो होते.त्यामनाने बटाटे व कांदे यांचे दर मात्र कमी होते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना महागाईचा फटका बसला. नाईलाज असल्यामुळे काही प्रमाणात भाजी खरेदी करावी लागली असली तरी आता ग्राहकांचा जोर कडधान्यावर असणार हे नक्की.
www.konkantoday.com