१० ऑगस्टपासून डबलडेकरच्या तीन डब्यात वाढ
रत्नागिरी ः कोकणात येणार्या पर्यटकांसाठी व गणपतीत येणार्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने आता डबलडेकरच्या डब्यात वाढ करण्याचे ठरविले आहे. सध्या लोकमान्य टिळक मडगांवला जाणार्या डबलडेकरला आठ डबे आहेत परंतु आता उद्यापासून या गाडीला तीन डबे जोडण्यात येणार असून आता ही गाडी ११ डब्यांची धावणार आहे. १० ऑगस्ट ते १४ सप्टेंबरपर्यंत दर शनिवारी व परतीचा प्रवास ११ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत दर रविवारी धावणार्या डबलडेकर तीन अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. याशिवाय १२ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर दर सोमवारी ते बुधवारी तसेच परतीच्या प्रवासात १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबरपर्यंत दर मंगळवारी ते गुरूवारी धावणार्या डबलडेकरला तीन वाढीव डबे जोडण्यात येणार आहेत.