रत्नागिरी शहरात सर्वत्र पेट्रोल उपलब्ध, टंचाई संपली

रत्नागिरी ः गेले दोन दिवस रत्नागिरी शहरात निर्माण झालेली पेट्रोल टंचाई आता दूर झाली आहे. रत्नागिरी शहरातील पंपांवर आता पेट्रोल व डिझेलचे टँकर आले असून बहुतेक पंपांवर पेट्रोल विक्री सुरू झाली आहे. पेट्रोल मिळविण्यासाठी नागरिकांनी शहरातील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली आहे. परंतु आता मिरज डेपो व वाशी डेपो येथून पेट्रोल कंपन्यांनी टँकर सोडले असल्यामुळे यापुढे सध्या तरी पेट्रोल टंचाई होणार नाही. असे असले तरी पेट्रोल मिळविण्यासाठी नागरिक पेट्रोल पंपाकडे धाव घेत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button