
म्हाडामध्ये लवकरच कर्मचार्यांची मेगा भरती, म्हाडाच्या बैठकीत निर्णय
रत्नागिरी ः म्हाडामध्ये अनेक विभागात रिक्त पदे असून लवकरच ६११ कर्मचार्यांची भरती होणार आहे. नुकतीच म्हाडाची वांद्रे येथे म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, सभापती मधु चव्हाण, मधु घोसाळकर, विजय नाहाटा, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. म्हाडाचे मुख्यालय मुंबई वांद्रे येथे असून राज्याच्या अनेक भागात विभागीय कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयात कर्मचार्यांची रिक्त पदे आहेत. यामुळे प्रकल्प राबविताना आहे त्या कर्मचार्यांवर ताण पडत आहे. यासाठी आता म्हाडाने ६११ कर्मचार्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी दिली.
www.konkantoday.com