मनसे नेते वैभव खेडेकर यांची जिल्हा कारागृहातून सुटका, समर्थकांची गर्दी
रत्नागिरी ः खेड येथील जगबुडी नदीवरील पुलाच्या जोडरस्त्याचा भराव खचल्याप्रकरणी खेडचे नगराध्यक्ष व मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आंदोलन केले होते. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली होती. यानंतर खेडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाची सुनावणी होवून खेडेकर यांची मुंबई हायकोर्टाने जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. खेडेकर हे सध्या रत्नागिरी येथील जिल्हा कारागृहात होते. आज त्यांची या कारागृहातून जामीनावर सुटका करण्यात आली. खेडेकर यांच्या स्वागतासाठी मनसेचे कार्यकर्ते व खेडेकर यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर कारागृहाबाहेर जमले होते. खेडेकर यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी आनंद साजरा केला. आपण जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करत होतो परंतु आता अशा चळवळीत काम करणार्या कार्यकर्त्यांवर ३५३ कलम लावून त्यांना अडचणीत आणले जात आहे. यामुळे सरकारी कर्मचारी चुकीचे वागत असेल तर त्यांना जाब विचारणे कठीण जाणार आहे याचा जनतेने विचार करावा अशी प्रतिक्रिया खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली आहे.
www.konkantoday.com