एस.टी. पाठोपाठ महावितरणचेही अतिवृष्टीत नुकसान
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सरकारी मालमत्तांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील एस.टी. विभागाचे नुकसान झाले असतानाच आता या अतिवृष्टीचा महावितरणला देखील फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक भागात विद्युत खांब कोसळणे, तारा तुटणे असे प्रकार घडले असून अनेक भागात विद्युत प्रवाहही खंडीत झाला होता. जवळजवळ अतिवृष्टीमुळे दीड हजार गावातील साडेचार लाख ग्राहकांना अंधारात रहावे लागले होते. मात्र महावितरणने अनेक भागात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यश मिळवले तर काही भागात अद्यापही विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा अंदाज आहे. या सर्व प्रकारात महावितरणचे अंदाजे ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com