ब्रीजवरुन युवक वाहून गेला वैभववाडी तालुक्यातील घटना

सिंधुुदुर्गः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील उंबरडे बौद्धवाडी येथील महेंद्र कदम हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला असून त्याचा शोध सुरू आहे. सध्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांना व ओढ्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. त्यामुळे अनेक भागात मार्ग बंद झाले आहेत. कामानिमित्त उंबर्डे बौद्धवाडी येथील काशिनाथ कदम व महेश कदम हे बाहेर गेले होते. ते कामे आटपून घरी परतत असताना नदीचे पाणी वाहत होते. त्या पाण्यातून पलिकडे जाण्याच्या प्रयत्नात काशिनाथ व महेंद्र हे दोघेही वाहू लागले. त्यातील काशिनाथ हा त्यातून बचावला. मात्र महेंद्र हा पुराच्या पाण्यातून वाहून गेला. त्याचा शोध सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button