तुरंबव येथे गणेश विसर्जनाला गेलेला तरूण नदीत पडून बेपत्ता

पाच दिवसांच्या गणेश विसर्जनादरम्यान दगडावरून पाय घसल्याने तोल जाऊन एक तरूण कापसी नदीत पडून बेपत्ता हाेण्याची घटना मंगळवारी सांयकाळी घडली. हा तरूण नदी परिसरात न सापडल्याने त्याचा शोध घेण्यात येत होता. सावर्डे पोलीस स्थानकात याबाबत त्याची बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
रजनीकांत गोपीनाथ पंडीत (३४, रा. तुरंबव, गणेशवाडी) हा पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी तुरंबव परिसरातील कापसी नदी या ठिकाणी गेला होता. यावेळी त्याचा पाय दगडावरून घसरल्याने तोल जाऊन तो नदीच्या प्रवाहादरम्यान वाहून गेला. यावेळी त्याचा शोध घेतला असता तो कोठेही सापडला नाही. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button