
करूणामूर्ती यांची कार व मृतदेह सापडला
रत्नागिरी ः जेएसडब्ल्यूचे कर्मचारी करूणामूर्ती यांची इको स्पोर्टस कार रविवारी उक्षी नदीत कोसळून ते बेपत्ता झाले होते. दोन दिवस त्यांचा शोध सुरू होता. आज त्यांची कार मिळून आली. तसेच त्याच्या जवळच त्यांचा मृतदेहही सापडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. करूणामूर्ती हे आपल्या सहकार्यांसह रविवारी उक्षी धबधब्यावर गेले असता ते रत्नागिरीकडे परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात होवून त्यांची गाडी नदीत कोसळली होती. मात्र गाडीतील इतर सर्व सहकारी सुरक्षितरित्या वाचले होते.
www.konkantoday.com