
मानसिक आरोग्याच्या रक्षणासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाची साडेतीन वर्षात उत्कृष्ट कामगिरी
राज्यातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या रक्षणासाठी रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाने गेल्या साडेतीन वर्षांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकाराखाली राबवण्यात येणार्या ’टेली-मानस सेवा’ आणि ’राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम’ या उपक्रमांमुळे मानसिक आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, राग्णालयातील सेवा सगळीकडे पोहोचत असल्याचे दिसून येत आहे.
रुग्णालयाच्या माहितीनुसार, गेल्या साडेतीन वर्षांत ९७,६०० बाह्यरुग्णांनी रुग्णालयातील सेवांचा लाभ घेतला आहे, तर ६,७५९ रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले. यामध्ये फक्त कोकणच नव्हे, तर सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि मुंबईसह परराज्यातील रुग्णांचा समावेश आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत रुग्णालयातील बाह्यरुग्णांची संख्या गत वर्षांमध्ये लक्षणीय वाढली आहे. २०२२-२३ मध्ये २५,३१८, २०२३-२४ मध्ये २९,९१० आणि २०२४-२५ मध्ये ४१,७७८ बाह्यरुग्णांनी सेवा घेतली. मानसिक आरोग्याची वाढती गरज लक्षात घेऊन ही सेवा आता प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात ६७प्राथमिक मानसिक आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मृतिभ्रंश क्लिनिक, ’डे के अर सेंटर्स’ व शाळा, महाविद्यालये, तुरुंग, वृद्धाश्रम, भिकारी निवार्यांमध्ये समुदाय स्तरावरील मानसिक आरोग्य तपासणी सत्रांचे आयोजन केले जाते.www.konkantoday.com




