राज्यात करोनाच्या ८९ नव्या रुग्णांची नोंद !


राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी ८९ नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे रुग्णांची संख्या १ हजार ५९३ वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या ७१९ इतकी झाली आहे.

राज्यामध्ये मंगळवारी सापडलेल्या ८९ रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील ३२, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील २३, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील ९, कल्याण महानगरपालिका व छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी ४, ठाणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका आणि सातारा येथील प्रत्येकी ३, चंद्रपूर २, नवी मुंबई, मीरा भाईंदर, रायगड, पुणे, सांगली आणि गोंदियामध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

राज्यात जानेवारी २०२५ पासून एकूण १८ हजार १०३ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ५९३ जण बाधित आढळले. आतापर्यंत ९५९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, ६१५ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button