
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्त स्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरग्रस्तस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पातळ्यांत वाढल्यामुळे आजूबाजूच्या घरात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. राजापूर शहर परिसर, लांजा साठवली, हरचेरी, चांदेराई आदि भागात पाणी शिरले रत्नागिरी जवळील प्रसिद्ध हातीस दर्ग्यात देखील पाणी आले उक्शी गावातील मुस्लिम मोहल्ल्यात देखील पाणी आले. यामुळे रात्रभर नागरिक जागे आहेत. साटवली भागात देखील काही घरात देवळात पाणी शिरल्याने तेथील ग्रामस्थांना अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. रात्रभर पावसाने उसंत न घेतल्याने ही पुरस्थिती कायम आहे. आज पावसाचा जोर कमी झाला तरच जनजीवन सुरळीत होऊ शकेल. कोकण रेल्वेची वाहतूकही अद्याप विस्कळीत झाली आहे .कोकण रेल्वेने अनेक गाडय़ा आजही रद्द केले आहेत .रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात घरांवर व गोठ्यांवर झाडे पडण्याचेही प्रकार झाले आहेत. जिल्हा प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे .तरी देखील नागरिकांनी सतर्क करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com