
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांना संस्थात्मक क्वारंटाईन केले
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनसंबंधी आदेशाचा भंग केला. त्यामुळे प्रशासनाने त्यांना सोमवारी संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्चच्या मध्यरात्री पूर्ण देश लॉकडाउन करीत जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास मनाई केली होती. हा नियम मोडीत माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांनी नगर येथील आपला गाव गाठला होता.अजून लॉकडाऊन सुरू आहे. दरम्याने शिक्षणाधिकारी कडूस सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना खबरदारी म्हणून संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे.
www.konkantoday.com