
चिपळूण घरफोडी प्रकरणात तीनजण ताब्यात
चिपळूण ः चिपळूण येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडी प्रकरणात पोलिसांनी पुणे येथून तीन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. सोमेश्वरन गायकवाड, सुरज जाबरे, साहिर सांबरे (सर्वजण रा. पुणे) त्यांना पुणे पोलिसांनी घरफोडी प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी अधिक तपासात त्यांनी चिपळूण-कराड येथे घरफोड्या व दुकान फोडल्याचे मान्य केले होते. त्यामुळे चिपळूण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
www.konkantoday.com