मोडकाआगर पुल धोकादायक असल्याचा अहवाल, वाहतूक पूर्णपणे बंद

0
152

चिपळूण ः चिपळूण गुहागर मार्गावरील मोडकाआगर पुल हा धोकादायक असल्याचा अहवाल संबंधित तज्ञांनी दिल्यामुळे या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पुल अनेक ठिकाणी मोडकळीला आल्यामुळे या पुलाची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. परंतु तरीदेखील या पुलाचा धोका कमी होत नव्हता. यामुळे या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हा पुल धोकादायक असल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक करावी असे राष्ट्रीय महामार्ग उपविभाग चिपळूण यांनी कळविले असून आता या मार्गावर नवा पुल होईपर्यंत लोकांना दुसरा वाहतुकीचा पर्याय राहणार नाही.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here