जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सामान घेवून जाणारा टेम्पो रूतला
रत्नागिरी ः शिर्के पेट्रोल पंपासमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशदारात मोठ्या प्रमाणावर झालेल्या चिखलाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून या ठिकाणाहून रोज शासकीय कामासाठी ये-जा करणार्या नागरिकांना व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करणार्या वाहनांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या चिखलामुळे आज सकाळी जड सामान घेवून जाणारा बेलोरो टेम्पोचे एक चाक रूतले. त्यामुळे हा टेम्पो अडकून राहिला. शेवटी अनेक लोकांनी हा टेम्पो ढकलून बाहेर काढला. या गेटसमोर असलेल्या चिखलावर योग्य तो मार्ग प्रशासनाने काढावा अशी जनतेची मागणी आहे.
www.konkantoday.com