कोकणातील अश्मयुगीन कातळ-खोद-चित्र पुस्तकाचे उद्या जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रकाशन
रत्नागिरी ः निसर्गयात्री संस्था रत्नागिरीच्यावतीने कोकणातील अश्मयुगीन कातळ-खोद-चित्र यावर आधारित माहिती देणार्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून या पुस्तकाचे प्रकाशन उद्या सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
कोकणवासियांनी गर्व बाळगावा असा जागतिक पातळीवरील महत्वपूर्ण ऐतिहासिक ठेवा कातळशिल्पच्या रूपाने उलगडला असून मानवी इतिहासातील कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून ओळखल्या जाणार्या या कलेचे कोकणातील कातळ-खोद-चित्र रूपी नमुने जपण्याची आवश्यकता आहे. या शिल्पांना संरक्षण लाभले. व त्यांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली तर पर्यटकांचा मोठा ओघ या ठिकाणी सुरू होवू शकतो. व त्या माध्यमातून स्थानिकांना या ठिकाणी रोजगारही उपलब्ध होवू शकतो.
कोकणात सापडलेली ही कातळ-खोद-चित्रांची रचना, गूढ, अगम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याविषयी प्राथमिक माहिती सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शन ठरणारी ही पुस्तिका तयार करण्यात आली असून त्याचे प्रकाशन मा. जिल्हाधिकारी यांचे हस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन निसर्गयात्री संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com