अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याचा कट,यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग,स्निपर रायफल,बॉम्ब सापडले
पाकिस्तानी लष्कर पुरस्कृत दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळालं असल्याचं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली असल्याची माहिती यावेळी भारतीय लष्कराने दिली आहे.
“गेल्या तीन ते चार दिवसांपुर्वी गुप्तचर यंत्रणांनी खात्रीलायक माहिती दिली असून पाकिस्तान आणि त्यांच्या लष्कराचं समर्थन असणारे दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत आहेत. याच माहितीच्या आधारे आम्ही शोधमोहिम सुरु केली होती. यावेळी आम्हाला चांगलं य़श मिळालं” अशी माहिती लष्कराचे वरीष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी दिली आहे.यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लोन यांनी पाकिस्तानी लष्कराचा थेट संबंध दर्शवणारे भुसुरुंग आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याचं सांगितलं. तसंच काही बॉम्बही सापडले आहेत. “अद्यापही शोधमोहिम सुरु आहे. शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तान पुरेपूर प्रयत्न करत आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही”, अशी माहिती ढिल्लोन यांनी दिली आहे.काश्मीरमधील सुरक्षेत अधिक वाढ करण्यात आली आहे.