
साळवी स्टॉप येथे ओव्हरब्रीजला मिळाली अंशतः मंजुरी
रत्नागिरी शहराचा विकास झपाट्याने होत असताना मिर्या ते नागपूर या महामार्गासाठी अडचणीची ठरणारी साळवी स्टॉप येथील चौकातील रहदारीची समस्या ओव्हरब्रिजमुळे सुटेल. रत्नागिरी शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार साळवी स्टॉप येथे ओव्हरब्रीज व्हावा अशी मागणी केली जात होती. त्याला आता अंशतः मान्यता मिळाली असून रत्नागिरी शहरातील पहिला ओव्हरब्रीज साळवी स्टॉप येथे होणार आहे.
www.konkantoday.com