स्थानिकांना ८० टक्के रोजगार : सुभाष देसाई

मुंबई : राज्यातील उद्योगांनी स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, असे १९६८पासूनचे शासकीय धोरण आहे. जे उद्योग या धोरणाची अंमलबजावणी करणार नाहीत, अशा उद्योगांचे जीएसटी व अन्य करांचे परतावे रोखण्यात येतील, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकऱ्या न देणाऱ्यांचे कर परतावे रोखण्यासाठी तातडीने नवा शासन आदेश जारी करण्यात येणार आहे. गरज पडली, तर आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर कायदा करण्यात येईल, असे उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button