न.प.च्या कृपेमुळे रत्नागिरीच्या रस्त्यांना ग्रामीण भागातील तांबड्या रस्त्याचा टच

0
385

रत्नागिरी ः कोकणातील निसर्गाचे भरभरून वर्णन केले जाते. कोकणातील निसर्गरम्य हिरव्यागार परिसराबरोबरच गावागावातील मातीचे तांबडे रस्ते याचे वर्णनही वारंवार केले जाते. परंतु आता रत्नागिरी नगर परिषदेने ही सुविधा शहरातील मुख्य रस्त्यासह अनेक भागात करून दिली आहे. शहरातील ८० फुटी मुख्य रस्त्याला अनेक ठिकाणी खड्ड्यांची जाळी पडली असून या ठिकाणांहून वाहनांना खड्डा चुकवून मार्ग काढणे कठीण होत आहे. पावसाने हे खड्डे भरले तर दुचाकीस्वारांना या खड्ड्याचा चांगलाच दणका बसत आहे. यावर उपाय म्हणून रत्नागिरी नगर परिषदेने दरवर्षीप्रमाणे चिर्‍याचा बुरूंब आणून हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र हे खड्डे भरल्यावर आलेल्या पावसाने हे खड्डे मुळ अवस्थेत येत असून मात्र रस्त्याचा हा परिसर ग्रामीण भागातील मातीच्या रस्त्याप्रमाणे दिसत आहेत. शहरातील विविध भागातील हे तांबडे रस्ते नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here