खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे नगराध्यक्षपद जिल्हाधिकार्यांनी घेतले काढून
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलाला बांधल्याप्रकरणी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा पदभार जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढला.मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट काम ठेकेदाराने केल्याप्रकरणी वैभव खेडेकर यांनी आंदोलन छेडले होते.यावेळी त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुलाला बांधून ठेवले.या प्रकरणी त्यांना अटक देखील झाली होती.यामुळे जिल्हाधिकार्यांकडून कारवाई झाल्याचे कळते.
www.konkantoday.com