
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी कदमवाडी येथे तरुणावर कोयतीने वार, एकास अटक
जुन्या वादातून तरुणावर कोयतीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील कुंडी कदमवाडी येथे गुरुवारी रात्री १०.३० वाजता घडली. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुनील दिलीप, मांजरेकर असे जखमीचे नाव आहे. हल्लेखोर तरुणावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. मनोहर वासुदेव खामकर असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही गटातील एकुण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथम फिर्याद संतोष जयराम मांजरेकर (४५) यांनी दिली आहे. संतोष मांजरेकर व मनोहर खामकर एकमेकांचे शेजारी आहेत. त्यांच्यात अनेक वर्षापासून वाद आहेत. संतोष याचा पुतण्या सुनील दिलीप मांजरेकर हा गुरुवारी रात्री मनोहर खामकर यांचे घरी गेला व आमचे विरुद्ध नेहमी अर्ज का देतोस अशी विचारणा केली. याचा राग मनोहर याने मनात धरून सुनील मांजरेकर याच्यावर कोयत्याने डोक्यावर वार केला. यावेळी मनोहर खामकरचा मामा भिकाजी सावंत व महिलेने सुनील मांजरेकर याला पकडून ठेवले. संतोष मांजरेकर यांनी दिलेल्या मनोहर खामकर (३५), भिकाजी धोंडू सावंत (५५), एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com




