सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही पावसाने झोडपले, सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावर वाहतूक ठप्प
सिंधुदुर्ग ः सिंधुुदुर्ग जिल्ह्यालाही गेल्या काही दिवसात झोडपले असून सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. वैभववाडी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून मांडुकली येथे पाणी भरले आहे. यामुळे ही वाहतूक राधानगरीमार्गे वळविण्यात आली आहे. मांडुकली येथे रस्त्यावर पाच फूटपेक्षा अधिक पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर येथून कोकणात येणार्या एस.टी. बसेस पर्यायी मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
www.konkantoday.com