बेकायदा दारू वाहतूक करणार्‍या टेम्पोवर कारवाई, ७ लाखांची दारु व टेम्पो जप्त

0
332

रत्नागिरी ः राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्याजवळ दाणोली रस्त्यावर बेकायदेशीर दारू करणार्‍या टेम्पोवर कारवाई केली. याप्रकरणी संशयित म्हणून हेमंत मेतर (रा. मालवण) याला ताब्यात घेण्यात आले आहे. या टेम्पोला तपासणीसाठी थांबविण्यात आल्यावर पाठीमागे टेम्पोच्या हौद्यात मासे वाहतुकीसाठी वापरले जाणारे क्रेट होते. अधिक तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे ३३ खोके आढळले. अंदाजे ३,७२,००० रु. किंमतीची ही दारू असून वाहतुक करणारा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here