नगरपरिषदेच्या पाणी खात्याच्या कारभारावर नगराध्यक्ष बंड्या साळवी संतप्त, अधिकार्यांची घेतली हजेरी
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरात सतत मुसळधार पाऊस पडूनही शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई भासत आहे. राजिवडा भागातील काही महिला पाणीप्रश्नावर नगरपरिषदेत धडकल्या असता या प्रश्नात खुद्द नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी लक्ष घातले. या पाणी टंचाईला पाणी विभागाचा कारभारच जबाबदार असल्याचे सांगून शहरात भर पावसातही ४० टक्के भागाला पाणी पुरवठा होत नसेल तर पाणी विभाग नेमकं कोणते काम करत आहे असा सवाल त्यांनी पाणी विभागाच्या अधिकार्यांना करून त्यांची चांगलीच हजेरी घेतली. पाणी विभागात एकमेकांवर समन्वय नाही, कोणी कुठेही कसेही पाणी सोडत आहे. यामुळे सर्व लोकांना व्यवस्थित पाणी मिळत नाही, असे दिसून आल्याने साळवी यांनी याबाबत पाणी विभागाला चांगलीच तंबी दिली. रोज उचलले जाणारे पाणी नेमके जाते कुठे? पाण्याच्या टाक्यांची लेव्हल करायला पाहिजे तर पंप बसवा अशाही सूचना त्यांनी देवून सर्वांना पाणी मिळावे यासाठी पाणी विभागाच्या कर्मचार्यांनी आणि अधिकार्यांनी तातडीने उपाययोजना करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
www.konkantoday.com