
२०१७ मध्ये अध्यादेशाची होऊनही अजून शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण नाही
रत्नागिरी :- शिक्षक भरतीचा शासकीय अध्यादेश २३ जून २०१७ रोजी जारी होऊन तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये भरतीची परीक्षा झाली. फेब्रुवारी २०१९ मध्ये बारा हजार जागांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. तब्बल दोन वर्षे उलटली असतानाही अद्याप भरती प्रक्रिया मात्र पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या भरतीची आता सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे.
२००९ला शेवटची भरती झाली होती.त्यामुळे ही भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे.
www.konkantoday.com