
नृत्य सादरीकरणाने साजरा झाला नृत्यार्पण नृत्य अकॅडमीचा आठवा वर्धापन दिन.
रत्नागिरी : भरतनाट्यम या नृत्य प्रकारासाठी प्रसिध्द नृत्यार्पण नृत्य अकॅडमीचा आठवा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गायिका संध्या सुर्वे आणि वनिता भरणकर उपस्थित होत्या. यावेळी नृत्यार्पण नृत्य अकॅडमीच्या संचालिका सौ. प्रणाली तोडणकर- धुळप आणि श्रीमती सुप्रिया तोडणकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.


यावेळी नृत्यार्पण नृत्य अकॅडमीच्या शिष्यांनी भरतनाट्यमचे विविध नृत्य प्रकार सादर केले. यावेळी संचालिका आणि गुरु सौ. प्रणाली तोडणकर- धुळप यांनी त्यांच्या शिष्यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक केले तर वरिष्ठ गटात अदिती घाणेकर- कोकजे आणि कनिष्ठ गटात शुभ्रा आंब्रे यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले.
