दुचाकी स्वाराने धडक दिल्याने तीन महिला जखमी
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे ते खंडाळा या रस्त्यावर रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या तीन महिलांना एका दुचाकी स्वाराने धडक दिल्याने त्या जखमी झाले आहेत. पूर्वा मिस्त्री ,मुक्ता खानविलकर ,विभक्ती निवळकर ,अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. यातील सुरेश निंबरे हा दुचाकीस्वार बोरवडेतून खंडाळा कडे जात असता त्यांचा स्कूटरवरील ताबा सुटल्याने त्याने या तीन महिलांना धडक दिली याबाबत स्कूटर स्वारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com