कराडचा जना कृष्णा पुल पुरामुळे पडला
कराड ः येथील जुना कृष्णा पुल दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला. सुदैवाने गेल्या आठवड्यापासून हा पुल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. पुल वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पुल पडलेल्या ठिकाणाची पाहणी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.